अतुट नातं मराठी कविता कवि - दीपा राऊत Manatle Sargam Marathi Hindi Kavita.

अतुट नातं 

तुझ्या संगे आयुष्य जगण्याचा
रंग आहे वेगळा.

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण
आठवतो मला सगळा.

आपल्या मधील नात्याची
सुरुवात होती आगळी वेगळी

आपल्या गोड नात्यामध्ये
उमलू लागली नाजुकशी कळी.

तुझ माझ अतुट नातं
असच कायम राहू दे.

तुझ्या माझ्या नात्याला
नजर नको लागू दे.

आपल्या नात्यातला ओलावा 
असाच कायम राहू दे.

तुझीच साथ मला
जन्मोजन्मी लाभू दे.

कवि - दीपा राऊत

Post a Comment

17 Comments