व्यथा ह्या मनाची | मनातले सरगम मराठी कविता | Vethya Hya Manachi | Manatle Sargam Marathi Hindi Kavita

व्यथा ह्या मनाची..

व्यथा ह्या मनाची
व्यक्त नाही करू शकत.

मनातील चलबिचल
नाही कुणाला सांगू शकत.

मनातील भावनांना
उघड नाही करू शकत.

मन माझे उडू पाहते
पण उडूही नाही शकत.

मनातील विचारांना
थांबवू ही नाही शकत.

मनातील ह्या कोड्याला
कुणीच नाही सोडवू शकत.

मनातील प्रश्नांची
उत्तरे नाही सापडू शकत.

व्यथा ह्या मनाची
व्यक्त नाही करू शकत
व्यक्त नाही करू शकत...



Post a Comment

11 Comments