माझ गाव कवि - दीपा राऊत. Manatle Sargam Marathi kavita

माझ गाव..

सुंदर माझ गाव,
गावात आहे छोटंसं तलाव.

चहू बाजूंनी उंच उंच डोंगर,
डोंगरावरून दिसते गाव खूप सुंदर.

डोंगरावरील धुके पाहुनी,
मन जाते थक्क होवूनी.

गावात होते हिरवीगार शेती,
शेती मधे भात पिकविती.

गावात आहे सुंदर मंदिर,
मंदिरात जाण्यास मन आमचे अधीर.

गावातल्या माणसांचा स्वभाव साधभोळा,
संकटाच्या वेळेस होतात सगळे एकत्र गोळा.

अशा सुंदर देवराईत आहे माझ गाव,
सुख समाधानाने नांदत माझ गाव.

कवि - दीपा राऊत.

Post a Comment

18 Comments