आमची सहल मराठी कविता कवि - दीपा राऊत Manatle Sargam Marathi Hindi Kavita

आमची सहल

निघालो आम्ही सहलीला
वयाची चाळिशी गाठूनी
गाडी होती आपल्या सुहासची
बसून घेतले सर्वांनी.

प्रवासाला सुरुवात केली
बाप्पाचे नाव घेऊनी
गाडीमध्ये मजामस्ती करत
गाठली आम्ही आंबोली.

एका टपरीवर केला नाश्टा
आंबोळी आणि चहा भजी खाऊनी
परत प्रवासाला सुरुवात केली
हास्य विनोद करुनी.

निसर्गाचा आनंद घेतला
सर्वांनी मन भरुनी
धबधबा, कावळेसाद,हिरण्यकेशी
आलो सर्व फिरुनी.

फिरता फिरता झाली दुपार
भोजन केलं सर्वांनी
भोजनाची व्यवस्था केली
आमच्या लाडक्या समीरनी.

निसर्गाचे छायाचित्र 
डोळ्यात ठेवले जपूनी
इतकं सुंदर वातावरण पाहुनी
आम्ही गेलो हरपूनी.

धबधब्याजवळ गाडी येताच
उतरून घेतले सर्वांनी
धबधब्याचे पाणी अंगावर पडताच
अंग आल शहारूनी.

रामचंद्राने गाडी चालवूनी
सर्वांना सुखरूप आला घेऊनी.

मित्र मैत्रिणींसोबतचा हा प्रवास
कायम राहणार अंत:करणी
ह्या अविस्मरणीय क्षणासाठी
सर्वांचे आभार मानते मनापासूनी.




Post a Comment

11 Comments