बाप मराठी कविता कवि - दीपा राऊत मनातले सरगम | Baap Kavita

❤️बाबा ❤️

घराचा आधारस्तंभ म्हणजे
बाप असतो.
वरून दिसतो कडक पण
आतून कापसा सारखा मऊ असतो.

लहानपणी बाप बोट धरून
चालायला शिकवतो.
बापाच्या पाऊलावर पाऊल ठेऊन
आपण चालत असतो.

बाप आपल्या खांद्यावर बसवून
अख्खा गाव फिरवतो.
बापाचा खांदा दुखला तरी
चेहऱ्यावर हसू ठेवतो.

बाप काबाडकष्ट करून 
पैसे कमावतो.
घराची जबाबदारी बाप
प्रामाणिकपणे सांभाळतो.

बाप स्वतःचा विचार
कधीच करत नसतो.
कुटुंबाला कायम सुखी
ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

सावली देऊन लेकरांना
स्वतः मात्र उन्हात राबतो.
मुलांचं भल व्हावं म्हणून
धडपड करत असतो.

बाप आपल्या मागे 
खंबीरपणे उभा असतो.
त्यामुळे आपण कोणतही काम
निडरपणे करू शकतो.

बापा एवढं काळीज 
कुणाचच मोठं नसत.
बापा एवढं समजून घेणार
पण कुणीच नसत.

लेकीसाठी तर बापाचं मन
हळवच असत.
लग्नात लेक सासरी जाताना
बापाचं हृदय भरून येत असत.

बाप आपल प्रेम कधीच 
दाखवून देत नाही.
पण त्यांच्या एवढं प्रेम
आपल्यावर कुणीच करू शकत नाही.

❤️बाबा ❤️


Post a Comment

8 Comments