आठवणी...मराठी कविता कवि - दीपा राऊत. Manatle Sargam Marathi Kavita

आठवणी

पंचवीस वर्षांनंतर भेट झाली मित्रमैत्रिणींची
खुशाली कळाली एकमेकांची. 

सर्वांना भेटून खूप आनंद झाला, 
शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला.

पंचवीस वर्ष वाट पाहिली या क्षणाची, 
सर्वांशी बोलून शांती झाली मनाची. 

सर्व एकमेकांशी बोलू लागलो, 
मेसेज कॉल करू लागलो.

एक दिवस सर्वांनी भेटायचं ठरवलं,
सहमतांनी ठिकाण ठरवल.

सगळ्यांच्या डोळ्यात भेटीची आतुरता होती, 
भेटल्यावर सगळ्यांची नजर ओळख पटवत होती. 

नंतर मात्र बोलायचं कुणी थांबतच नव्हते,
प्रत्येकाचे किस्से संपतच नव्हते.

शाळेतील आठवणींच भांडार उघडलं, 
सगळ्या आठवणी ताज्या करून गेलं. 

सर्वांनी हास्य-विनोद करत जेवण उरकलं, 
नंतर मात्र गप्पा-गोष्टींना उधाण आलं.

आठवणींच्या दाट गर्दीतून बाहेर आलो, 
नंतर सगळे आप-आपल्या घरी निघालो. 

ह्या सर्वांपासून लांब जावसं वाटत नव्हतं, 
अंत:करण सारख भरून येत होतं.

असा हा अविस्मरणीय दिवस कुणीच विसरणार नाही, 
आमच्यातली मैत्री कधीच कमी होणार नाही.

कविता - दीपा राऊत

Post a Comment

21 Comments

  1. खुप सुंदर, मनातले शब्द ओठांवर आले..

    ReplyDelete
  2. Awesome💥😍🔥💯

    ReplyDelete
  3. सुंदर

    ReplyDelete
  4. अप्रतिम आहे 👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम आहे 👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान अप्रतिम

    ReplyDelete
  7. खुप छान

    ReplyDelete