गाव | कवि - दीपा राऊत | Manatle Sargam | Marathi kavita

गाव

हिरव्यागार शेतान भरलेलं
माझ गाव
गाई गुरे चरताना दिसतं ते
माझ गाव
चारही बाजूंनी निसर्गानं नटलेल
माझ गाव
डोंगराच्या कुशीत वसलेल 
माझ गाव
माणुसकीच्या माणसांनी भरलेलं 
माझ गाव
रस्त्यावर मधेच वडाचं झाड असलेलं
माझ गाव
वडाच्या पारावर बसून गप्पा मारणाऱ्यांच
माझ गाव
वडाच्या पारंब्याला झोके घेणाऱ्या
मुलांचं माझ गाव
गावात छोटसच पण सुंदर मंदिर असलेलं
माझ गाव
गावात येताच हिरवळीने स्वागत करणार
माझ गाव
मोठमोठ्या झाडांनी रस्त्याला सावली देणार
माझ गाव
शेताच्या बाजूने वाहणारी नदी असलेलं
माझ गाव
गावातल्या वनराईत रानटी फळे
भेटणार माझ गाव
अश्या सुंदर देवराई सजलेलं
माझ गाव.

कवि - दीपा राऊत

Post a Comment

8 Comments