❤️कन्या ❤️
कन्या आहे ज्याच्या घरी
त्याच्या घरी लक्ष्मी वास करी.
गर्भात लागली मला तिची चाहूल
अंगणात माझ्या तिचं नाजूक पाऊल.
मुलगी म्हणजे आईचं दर्पण
मुलीच प्रेम मात्र बापावर अर्पण.
मुलगी असते आईची सावली
सर्वांवर जीवापाड प्रेम करणारी माऊली.
हसत खेळत वाढली लेक माझी कौतुकाची
आली जाण छकुलीला मायबापाच्या सुखाची.
गुणाची पोर माझी आहे जशी परी
उद्या निघून जाणार कुणा परक्याच्या घरी.
माझ्या लेकीला लाभो सुखाचे सासर
खूप प्रेम मिळू दे देवा एवढाच दे वर.
लाभू दे आयुष्य उदंड
होऊ दे नभाहून मोठी
लेक होऊनी जन्मोजन्मी
ती यावी माझ्या पोटी.
लेक म्हणजे ईश्वराची देणगी
लेक म्हणजे अमृताच बोल
तिच्या पाऊल खूणांनी
सुखं दुःखही होई अनमोल.
2 Comments
खूप छान 👌👌
ReplyDeleteKhup MST 💞💖
ReplyDelete