गीत माझ्या मनातले | मनातले सरगम कवि दीपा राऊत | Geet Mazya Manatle

" गीत माझ्या मनातले."

गीत माझ्या मनातले,
स्वर बनुनी ओठांवरी आले.

मनातले शब्द - निशब्द,
कागदावरी मी लिहूनी काढले.

कागदावरील शब्दांचे,
कवितेत रूपांतर झाले.

प्रत्येक स्वराला महत्व आले,
कवितेला माझ्या शीर्षक मिळाले.

कविता करुनी मलाही समाधान लाभले,
आणि मनातले सरगम उदयास आले.


Post a Comment

16 Comments